सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिरवळ हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उध्दवस्त केला. पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगाराच्या साहित्यासह रोकड, विदेशी दारू, दुचाकी, चारचाकी वाहनांसह १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ४५ जणांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांकडून जुगार अड्डा उध्वस्त
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावच्या हद्दीतील एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे शिरवळ आणि भुईंज पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा मारला असता एकूण ४३ जण जुगार खेळताना सापडले. घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगार साहित्य, विदेशी दारु, मोबाईल, ६ चारचाकी आणि १४ दुचाकी वाहने, असा एकूण १ कोटी ९. लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
साताऱ्यातील आरोपींची संख्या जास्त
शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गजें, आरसीपी प्लाटूनचे जवान आणि शिरवळ, भुईंज पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये जुगार अड्डा चालक, पोल्ट्री फार्मच्या मालकावर एकूण ४५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सातारा जिल्ह्यातील फलटण खंडाळा, वाई तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, वेल्हा, सासवड, पुरंदर, कात्रज, स्वारगेट, बिबवेवाडी, सिंहगड रोड या परिसरातील आहेत.
आरोपींची नावे –
खंडाळ तालुका – जुगार अड्डा चालक रमजान उर्फ मुद्रा गणीभाई शेख (रा. शिरवळ), पोल्ट्री शेड मालक रमेश बाबासाो मोटे, राहूल सिध्दराम गोंडगाव, विजय पांडुरंग भंडलकर, अनिश शमशुद्दीन खान, असिफ अफजल खान, अभयसिंह चंद्रकांत नावरे, प्रकाश बच्चन राऊत, बापू लक्ष्मण आगम, भूषण शिवाजी शिंदे, महेंद्र विष्णू फडतरे, विलास सुरेश वैराट, वैभव विजय भुतकर, शब्बीर गफार पठाण, शाहिन शौकत बागवान, प्रकाश अशोक जाधव, विकास संजय पवार, मयुर अशोक जाधव, ऋषीकेश बंडू पवार, अशोक सोपान चिकणे
वाई तालुका –
मिलींद साहेबराच विहीळकर
फलटण तालुका –
अविनाश भानुदास पेडकर, तानाजी शामराव कोळपे, चंदन अशोक काकडे
भोर तालुका –
विठ्ठल भिकोबा घुमाळ, सोमनाथ बाळासो जाधव, रोहित बाळू कुंभकर, सुर्यकांत हरीश्चंद्र साळुंखे, धर्मेंद्र पिसुलाल जैन
पुरंदर तालुका –
विशाल भारत नगरे, आकाश संजय जगताप, प्रशांत रमेश जगताप, स्वप्नील विनायक जगताप, गोरख वसंत कांबळे
बारामती तालुका –
आप्पासो लालासो सालगुडे, लक्ष्मण गणपत गोफणे, राजेंद्र उत्तम तावरि, सुनिल किसन मुळीक
वेल्हा तालुका –
सागर एकनाथ गायकवाड
पुणे शहर –
सुभाष गणपत गायकवाड (कोथरुड), नंदू मनीराम जस्वाल, तुकाराम साहेबराव दराडे (स्वारगेट), ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (सिंहगड रोड), सुनिल ब्रदीनाथ सुर्यवंशी, राम भुजंग साठे (बिबवेवाडी)