‘माझी शाळा’ उपक्रमात जिल्ह्यातील ‘या’ ZP शाळेने फडकवला यशाचा झेंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेचा निकाल काल रविवारी जाहीर झाला. या स्पर्धेत राज्यस्तरीय खासगी शाळा स्पर्धेत भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर (ता. गंगापूर) शाळेने तृतीय क्रमांक पटकावला, तर विभागस्तरीय स्पर्धेत शासकीय गटात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सातारा ने प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. स्पर्धेत राज्य स्तर, विभाग स्तरावर पुरस्कारप्राप्त शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी मुंबई येथे गौरविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पालक आणि माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी; तसेच स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. विविध बाबींवर शाळांचे मूल्यांकन केंद्र स्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर करण्यात आले.

जिल्हास्तरीय निकाल शासकीय

1) प्रथम क्रमांक : जि.प. शाळा, जळगाव मेटे (फुलंब्री)

2) द्वितीय क्रमांक : जि.प. शाळा, केऱ्हाळा (सिल्लोड),

3) तृतीय क्रमांक : जि.प. शाळा, तारू पिंपळगाव (पैठण)

खासगी शाळांमध्ये : भोंडवे पाटील स्कूल, बजाजनगर (राज्य स्तरासाठी निवड)

1) प्रथम क्रमांक : चैतन्य व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, करमाड

2) द्वितीय क्रमांक : कौशल्या विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, पाटेगाव

3) तृतीय क्रमांक : एस.बी. हायस्कूल, गोंदेगाव (सोयगाव)

विभागस्तरीय निकाल शासकीय

1) प्रथम क्रमांक : जि.प. प्राथमिक शाळा, सातारा (छत्रपती संभाजीनगर)

2) द्वितीय क्रमांक : सीपीएस स्कूल, मानवत (परभणी)

3) तृतीय क्रमांक : जि.प. शाळा, जरेवाडी (बीड)

खासगी शाळांमध्ये

1) प्रथम क्रमांक : दशरथ बाबा महाडीक विद्यालय, जालना

2) द्वितीय क्रमांक : बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत (हिंगोली)

3) तृतीय क्रमांक : छत्रपती शिवाजी हायस्कूल, जालना