उंब्रजच्या भराव पुलावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक, आसगावचा युवक जागीच ठार तर एकजण गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग उंब्रज येथील भराव पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असून अन्य एकजन गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवक सातारा तालुक्यातील आसगावचा रहिवासी आहे.

घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी कराड वरून साताऱ्याला जात असताना उंब्रज गावाच्या हद्दीत भराव पुलावर सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडक यामा कंपनीची एफ झेड मोटरसायकलला बसली. सदर अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला. सूर्यकांत शहाजी भोसले (वय २२, रा. आसगाव ता. जि. सातारा) असे सदर युवकाचे नाव आहे. तसेच यश काळे (वय २३, रा. फत्यापूर, ता. जि. सातारा) हा जखमी झाला आहे.

घटनास्थळी उंब्रज पोलीस व हायवे देखभाल विभागाचे दस्तगीर आगा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मदतकार्य करुन वाहतूक सुरळीत केली.