कोळेवाडीत 32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कोळेवाडी येथील एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. तेजपाल अशोक पोतेकर (वय 32, रा. कोळेवाडी) असे संबंधित युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोळेवाडी येथील ‘पन्हाळी’ नावाच्या ओढ्याकडेला तेजपाल पोतेकर याने ओढ्याकडेला झाडास गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील उषा पाटील यांना दिली. त्यानंतर तालुका पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत प्रकाश बापूराव भोसले यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.