सातारा प्रतिनिधी । पैसे उकळण्याच्या उद्देशाने लग्नाचे वाचन देत त्यानं तरुणाशी साखरपुडाही केला. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन लग्न न करताच तरुणीने ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाशी काजलशी (वय २३, रा. सातारा, बदललेले नाव) ओळख होती. या ओळखीतून पूजाने त्याच्याकडून सुरुवातीला व्यवसायात गुंतवणुकीसाठी एक लाख रुपये घेतले. त्यानंतर भेटीगाठी वाढवून तरुणाला लग्न करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. आणखी पैसे उकळण्याच्या उद्देशाने साखरपुडा होऊनही लग्न पुढे ढकलले. तरुणाच्या दाजींनी तिला १० लाख रुपये दिले व तरुणाने ५ लाख व लग्नासाठी दिलेले दागिने असे १६ लाख रुपये तिला दिले.
मात्र, तिने लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने तिला गेल्या वर्षभरापासून पैसे परत मागण्यात येत होते. परंतु तिने पैसे परत केले नाहीत. या प्रकारानंतर तरुणाने १० डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते हे अधिक तपास करीत आहेत. सातारा शहरातील राधिका रस्त्यावर एक दुकान आहे. या दुकानात दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार १९ नोव्हेंबर २०२२ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांचे एक पथक तरुणीच्या घरी गेले होते. मात्र, ती घरातून गायब झाली आहे. पोलिसांकडून तरुणीचा शोध घेतला जात आहे.