कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयातील युवा मतदार विद्यार्थी व कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून रेठरे बुद्रुक येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीच्या माध्यमातून युवा मतदारांनी “आम्ही मतदान करणार तुम्हीही करा,” अशा आशयाची जनजागृती केली या रॅलीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सीबी साळुंखे जिमखाना विभागाचे डॉक्टर विशाल साळुंखे एनसीसी विभागाचे डॉक्टर व्ही के सोनवणे प्राध्यापिका डॉक्टर स्नेहल राजहंस संजय पाटील स्विप विभागाच्या प्रमुख सुप्रिया पोवार पल्लवी पाटील आनंदराव जानुगडे संतोष डांगे ऋषिकेश पोटे मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग यांना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर स्नेहल राजहंस यांनी केले. यावेळी निकिता नामदास सुस्मिता जाधव स्मिता खैरमोडे यांनी मतदान जागृतीचा गोंधळ सादर केला. सूत्रसंचालन माधवी पवार यांनी केले संजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी एनसीसीचे विद्यार्थी तसेच बीएलओ यांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली.
ही रॅली जुळेवाडी शेरे, गोंदी रेठरे बुद्रुक शिवनगर या ठिकाणी मतदान जागृती करून परत महाविद्यालयात आली. प्रतिज्ञा वाचन आनंदराव जानुगडे यांनी केले. या कार्यक्रमास तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील कोतवाल अंगणवाडी सेविका बीएलओ उपस्थित होते.