कराड प्रतिनिधी | “देशातील योजनांचा लाभ सर्वांसाठी, सुरक्षा सर्वांसाठी देणार मात्र तुष्टीकरण कोणाचेही होणार नाही. हेच उद्दिष्ट घेऊन राज्यातील महायुतीच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे. त्याला सर्वांची साथ अपेक्षित आहे, त्यामुळे सामान्यांनी नवे राज्य घडविण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे. हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुती चे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेत उपस्थित लावली. यावेळी निळकंठ धारेश्वर महाराज सुंदरगिरी महाराज, महालिंगेश्वर महाराज, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राज्याचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, रामकृष्ण वेताळ, चित्रलेखा माने-कदम, वासुदेव माने, भीमराव पाटील, शंकरराव शेजवळ, सीमा घार्गे, अंजली जाधव, सचिन नलवडे, दीपाली खोत, प्रदीप साळुंखे, पवन निकम, नवीन जगदाळे उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देश जोडणारी ताकद काम करत आहे.
तर दुसऱ्या बाजूला महाबिघाडी गटबंधन देश तोडण्यासाठी एकत्र आले आहेत. आपण एकत्र राहिलो पाहिजे. राम मंदिरासाठी पाचशे वर्षे वाट बघावी लागली. काशी विश्वेश्वरय्या, मथुराची अवस्था तीच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांचे वैभव असणारे प्रतिके अतिक्रमित झाली, आमच्या गणपती उत्सवावर, राम उत्सवावर दगडफेक होते. त्यामुळे एक राहा. सर्वांनी एक राहिले पाहिजे. आपली ताकद विखुरता कामा नये. देशाला एकजूट करण्याचे काम मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.