कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. दरम्यान यंदा प्रदर्शन अजून एक दिवस वाढवण्यात आलेले आहे. प्रदर्शनात चौथ्या दिवशी फळे, फुले आणि श्वान स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेत दाखल झालेल्या श्वानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान प्रदर्शनाचे आजच्या दिवसाचे खास आकर्षण ठरले ते ग्रेडेन डॉग आणि शिजू डॉग होय. डॉग शो पाहण्यासाठी करासह पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनास मोठ्या संख्येने जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून कराड येथे कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने गेली १८ वर्षे हे कृषी प्रदर्शन होत आहे. शेती उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शनाची परंपरा कायम ठेवत यंदाही भव्य स्वरूपात प्रदर्शन पार पडत आहे.
आजपर्यंत प्रदर्शनास 7 ते 8 लाख लोकांनी भेट दिली असून रविवार व सोमवारी भेट देणाऱ्या शेतकरी, ग्राहक, विध्यार्थी भेटीने गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला उद्या मंगळवार रोजी पर्यंत एक दिवसच प्रदर्शनाचा उरला होता. गर्दी,शेतकरी, स्टॉल धारक यांची मागणी विचारात घेऊन बुधवार दि 29 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याचा लाभ शेतकरी ग्राहक यांनी घ्यावा असे आवाहन डायनॅमिक इव्हेंट कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे. स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन बुधवारपर्यत खुले राहणार
१८ वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन प्रतिवर्षी प्रमाणे दि. २४ ते २८ नोव्हेंबर पर्यत होते. मात्र शेतकरी, स्टॉल धारक यांच्या आग्रहास्तव प्रदर्शन एकदिवसाने वाढवून बुधवार दि. 29 रोजीपर्यत खुले राहणार असल्याची माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी दिली.
प्रदर्शनात 2 टनाचा ‘गजेंद्र’ ठरतोय आकर्षण
कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात गजेंद्र नावाचा 2 टन वजनाचा रेडा सहभागी झाला आहे. बेळगांव येथील ज्ञान देव नाईक यांचा हा रेडा असून त्याचे वजन 2 टन असल्याने त्याचे नांव त्यांनी गजेंद्र ठेवले आहे. अनेक प्रदर्शनात हा रेडा सर्वाचा कुतूहल व आकर्षणाचा विषय राहिला आहे. या रेड्याचा प्रतिदिनी 2500 ते 3000 हजार इतका खर्च असून रोज 5 किलो सफरचंद ,गव्हाचा आटा, आणि काजू चा खुराक दिला जातो. या गजेंद्र ने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रदर्शन गाजवली असून 1.5 कोटी रुपयांची मागणी या रेड्याचा आली होती. या रेड्याला बघण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केली. तो लोकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया प्रदर्शनाने गर्दीचा मोडला उच्चांक…
कराड येथील कृषी प्रदर्शनास दरवर्षी लाखो शेतकरी, लोक भेटी देतात. यंदाच्या वर्षी देखील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे प्रदर्शन आलेल्या या प्रदर्शनास शेतकरी परिसंवाद कार्यक्रम देखील पार पडत आहे. यंदाच्या वर्षी कृषी प्रदर्शने आतापर्यंत पार पडलेल्या प्रदर्शनाचा गर्दीचा उच्चांक मोडला आहे. चार दिवसात सुमारे नऊ लाख शेतकरी, विविध जिल्हयातील बचत गट, नागरिकांनी प्रदर्शनात भेट दिली आहे.