सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झालयानंतर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर याशनी नागराजन यांनी मंगळवारी ठीक सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर ठीक अकरा वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा देखील घेतला.
राज्य शासनाच्यावतीने नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे करण्यात आली. तर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या २०२० च्या आएएस अधिकारी आहेत. त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या.
बदली झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना तसेच सातारा जिल्हातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी स्वागत केले. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अकराच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.
यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी घुले, जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या अर्चना वाघमळे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोदी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.