शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : याशनी नागराजन

0
131
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील रोजगार हमी योजना, जलजीवन मिशनसह अन्य योजनांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नुकत्याच भेटी दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांची पंचायत समिती स्तरावर प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

यावेळी माणचे गटविकास अधिकारी प्रदिप शेंडगे, पाणी पुरवठा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागराजन यांनी गुरुवारी दिवसभर माण तालुक्यातील किरकसाल, दहिवडी शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 3, पंचायत समिती दहिवडी, पुळकोटी, पानवण, हिंगणी, धुळदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, जलसंधारण, जलजीवन मिशन, रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी दिल्या. रात्री उशिरापर्यंत माण तालुक्यातील गावोगावी सुरु असलेल्या कामांना भेटी दिल्या. त्यावेळी गावातील ग्रामस्थ व अधिकार्‍यांशी संवाद साधला. ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत त्या ठिकाणी त्यांनी अधिकार्‍यांना कामाच्या गुणवत्तेबाबत सूचना केल्या.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशन योजनेंर्तगत हिंगणी येथे नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करावे. तसेच प्रेशर फिल्टर रुमसाठी तत्काळ जागा उपलब्ध करुन देण्याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना सूचना केल्या. तसेच प्रस्तावित फिडींग पॉईंटचीही पाहणी केली. धुळदेव या टंचाईग्रस्त गावांची पाहणी करुन तेथील नळपाणीपुरवठा विहीरीस नागराजन यांनी भेट दिली