पेन्शन अदालत व विभाग प्रमुखांची कार्यशाळा उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महालेखापाल कार्यालय, मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय सातारा यांचे संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पेन्शन अदालत व विभाग प्रमुखांची कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे हे होते.

यावेळी कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून राहुल कदम, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जि.प., महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचे कार्यालयातील वरिष्ठ लेखा अधिकारी जया गोमेज, भारती कटुरिया, मरिना डिमेलो, मंगेश जाधव, प्रभारी कोषागार अधिकारी योगेश करंजेकर, अप्पर कोषागार अधिकारी प्रविण पाटील, अप्पर कोषागार अधिकारी कांचन डिके, पर्यवेक्षक श्री.गोडबोले, किर्ती जाधव, पल्लवी गवारी आदी उपस्थित होते.

या पेन्शन अदालतीमध्ये उपस्थित निवृत्तीवेतन धारक तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांच्याशी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असणा-या समस्याबाबत थेट संवाद करुन येणाऱ्या अडचणींचे निराकरण लवकरात लवकर करण्याची हमी दिली. विभाग प्रमुखांच्या कार्यशाळेत प्रलंबित प्रश्नांबाबत व कार्यप्रणालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यशाळेसाठी मोठया संख्येने जिल्हयातील निवृत्तीवेतनधारक व त्यांचे संघटनाचे पदाधिकारी तसेच कार्यरत विभागप्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी याबाबत येणा-या अडचणीबाबत विविध व्हिडीओव्दारे व मौखिक माहिती देण्यात आली.

कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्रीमती सुजाता भिडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक तानाजी आवळे तसेच साईराम कुलकर्णी,शरीफ शेख, स्वप्निल जाधव, गणेश मोरे,भाग्यश्री हेंद्रे, रुपाली भोसले, शितल लांडगे, पदमा गायकवाड, ज्योती जाधव, समिता पानवलकर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. तर कार्यक्रमाची संपुर्ण तांत्रिक बाजु अभिषेक बोडरे, संकेत तोडकर यांनी निभावली.