भिंतीला प्लास्टर करताना अचानक पायडावरून ‘त्यांचा’ खाली गेला तोल; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील एलबीएस काॅलेजजवळ भिंतीला प्लास्टर करताना पायडावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शमशेर बाबुलाल पठाण (वय ५०, रा. सदर बझार सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील सदरबझार मध्ये राहत असलेले शमशेर पठाण हे एलबीएस काॅलेजजवळील एका घरात पायडावर उभे राहून भिंतीला प्लास्टर करत होते. मात्र, अचानक पायडावरून ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला आणि हातापायाल गंभीर दुखापत झाली.

त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दि. १४ रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, हवालदार महेंद्र पाटोळे हे अधिक तपास करीत आहेत.