सातारा प्रतिनिधी । म्हासोली येथे नुकताच महिला बचत गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांनी उपस्थिती लावली. यावेळी “महिलांनी आता स्वावलंबी व स्वाभिमानी बनणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जि. प. सदस्या मंगल गलांडे, तालुका अध्यक्षा विद्याताई थोरवडे, गाैरी शेवाळे, रझिया शेख, मालन परळकर, शैला पाटील सरपंच सुमती शेवाळे, ग्रामसंघ अध्यक्षा वंदना पाटील, महिला काँग्रेस सचिव धनश्री महाडीक, मंजिरी पानसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अल्पना यादव यांनी महिला बचत गटाच्या उन्नतीसाठीच्या अनेक योजनांची माहिती दिली.
यावेळी सरपंच सुमती शेवाळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून गावातील अनेक महिलांचे जीवन सुखकर झाल्याचे म्हंटले. यावेळी सचिव वर्षा कुंभार यांनी स्वागत केले. सुप्रिया पाटील, कोषाध्यक्षा स्वाती पाटील यांनी सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.