कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील २०१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये १०१ ग्रामपंचायतीत महिलाराज येणार असून तब्बल ६१ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबाळे, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज काटे, युवराज पाटील, आनंदराव पोळ, सुनील काळेल, प्रसाद देशपांडे, महसूल सहाय्यक सुरज लोकरे, अभिजीत रावते यांच्यासह संबंधित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गावनिहाय जाहिर झालेली आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे –
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला – शिंगणवाडी, माळवाडी, आणे, चोरजवाडी, घोणशी, वाण्याचीवाडी, भोसलेवाडी, वनवास्माची, पवारवाडी, आरेवाडी, मेरवेवाडी, बेलवाडी.
अनुसूचित जाती प्रवर्ग – बाबरमाची, विठोबाचीवाडी, सयापुर, वराडे, नारायणवाडी, येवती, विरवडे, भोळेवाडी, शेळकेवाडी, बामणवाडी, हवेलवाडी, हनुमानवाडी.
अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला – सुपने
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – नडशी, राजमाची, कोरेगाव, शेणोली, सैदापूर, साकुर्डी, नांदगाव, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, कुसुर, मस्करवाडी, वसंतगड, चिंचणी, अंधारवाडी, लोहारवाडी, करंजोशी, सावरघर, कालगाव, चरेगाव, कोनेगाव, किरपे, कोळेवाडी, डिचोली, मुनावळे, घोगाव, संजयनगर, भुरभुशी, कोर्टी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – संजयनगर, कोयना वसाहत, येळगाव, कोरीवळे, खराडे, खालकरवाडी, तुळसण, रेठरेखुर्द, येरवळे, पाडळी, केसे, वडगाव-उंब्रज, तासवडे, शिंदेवाडी, तळबीड, धनकवडी, मांगवाडी, करवडी, निगडी, नानेगाव, टेंभू, मरळी, कापील, पाचुपतेवाडी, हरपळवाडी, विंग, वाठार, आदर्शनगर.
सर्वसाधारण महिला प्रवर्ग – तारुख, वहागाव, चिखली, मसूर, शिरवडे, गोडवाडी, अकाईचीवाडी, महारुगडेवाडी, साबळेवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, शेवाळेवाडी, बनवडी, मालखेड, कालवडे, कामथी, शेवाळेवाडी, वडोली निळेश्वर, पोतले, गोळेश्वर, किवळ, जुळेवाडी, इंदोली, कार्वे, शहापूर, जिंती, पाचुंद, शितळवाडी, यादववाडी, शेळकेवाडी, घोलपवाडी, खोडशी, हजारमाची, कालेटेक, बेलवडे बुद्रुक, जखिणवाडी, वस्ती साकुर्डी, काले, गोवारे, शामगाव, हणबरवाडी, पश्चिम सुपने, मुनावळे, दुशेरे, गोंदी, उत्तर कोपर्डे, नांदलापूर, बाबरमाची, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनू, उंब्रज, हेळगाव, गणेशवाडी, बानुगडेवाडी, धावरवाडी, यशवंतनगर, खोडजाईवाडी, कोडोली, सवादे.
सर्वसाधारण – गायकवाडवाडी, वाघेश्वर, अंबवडे, अभयचीवाडी, खुबी, भुयाचीवाडी, अंतवडी, पेरले, वनवासनाची, ओंड, उत्तर तांबवे, चोरे, कचरेवाडी, वडगाव हवेली, भांबे, कासारशिरंबे, भवानवाडी, पिंपरी, पाडळी, हेळगाव, साळशिरंबे, गोटे, घराळवाडी, केसे, लटकेवाडी, येणके, आटके, कांबिरवाडी, डेळेवाडी, म्होप्रे, वारुंजी, मुंढे, म्हासोली, शेरे, जुजारवाडी, हिंगणवाडी, चौगुलेमळा, हनुमंतवाडी, शिवडे, साजूर, धोंडेवाडी, ओंडोशी, कोळे, टाळगाव, गमेवाडी, गोसावेवाडी, वाघेरी, शिरगाव, बेलवडे हवेली, रिसवड, घारेवाडी, वानरवाडी, वडोली भिकेश्वर, बेलदरे, पार्ले, पाल, विजयनगर, तांबवे, जुने कवठे, नवीन कवठे, उंडाळे.