कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रीतीसंगम परिसरात गणेश विसर्जन करताना कराडमधील गोठे येथील अधिकराव दिनकर पवार यांच्या गणेशाच्या गळ्यातील दहा तोळ्याची सुमारे आठ लाख रुपये किंमती माळ नदीत पडली. ही माळ त्याठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहा फकीर यांना सापडली.
ही माळ त्यांनी सोनारामार्फत पोलिसांना संपर्क करून माळ अधिकराव यांना परत केली. नूरजहा यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल दहा हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.
मागील महिन्यात पालघरमधील एका कुटुंबाचे २५ लाख रुपये किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. त्यानंतर पालघरच्या नजीरुल याकूब हसन यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी बॅग शोधून मुद्देमालासह परत केली होती. नजीरुल यांना सोन्याचे दागिने पुन्हा मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.