कराड दक्षिण मतदारसंघात कोणत्या गावात किती टक्के झालंय मतदान? पहा यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने ७६.२६ टक्के मतदान झाले असून मतदानादरम्यान अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान केंद्राच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस मतांचा टक्का चांगलाच वाढला आहे. या मतदार संघात एकूण ३ लाख १५ हजार ४२० इतकी मतदार संख्या आहे. यापैकी २ लाख ४० हजार ७४३ इतके मतदान पार पडले आहे. यामध्ये १ लाख २३ हजार ८९६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून १ लाख १६ हजार ८३५ स्त्रीयांचे मतदान झाले आहे. तर १२ तृतीय पंथीयांनी मतदान केले आहे.

दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या गावातील मतदान केंद्र बूथ निहायक यादवी समोर आली आहे. यामध्ये तालुक्यातील प्रत्यक गावातील बूथ निहायक एकूण असलेल्या मतदारपैकी किती मतदारांनी मतदान केले आहे. यासह टक्केवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिन्याभरापासून तापलेले राजकीय वातावरण बुधवारी मतदानानंतर शांत झाले. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कराड दक्षिण, मतदारसंघातील ३४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार झाली. प्रमुख उमेदवारांपैकी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडला, अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथे मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने महिला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंक बूथ केंद्राचा उपक्रम राबवला. शाळकरी विद्यार्थी, आशा स्वयंसेविका यांनी स्वयंसेवक म्हणून काम करून मतदारांना केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी मदत केली. कराड दक्षिण मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.६३ टक्के, अकरा वाजेपर्यंत १९.७१, दुपारी एकला ३६.५८, दुपारी तीनला ५२.५६, पाच वाजेपर्यंत ६७.९१ आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७६.२६ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कराडमधील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशिन आणण्यात आली.

कोणत्या गावात किती टक्के झाले मतदान? पहा यादी

WhatsApp Image 2024 11 21 at 5.18.44 PM 1
WhatsApp Image 2024 11 21 at 5.24.48 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.21.23 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.25.13 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.22.37 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.25.41 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.23.12 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.26.05 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.24.18 PM
WhatsApp Image 2024 11 21 at 5.26.30 PM