कराड प्रतिनिधी । कराड उत्तरमधील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजनेपैकी धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एकची सर्व कामे पूर्ण झाली आहे. ही योजना दि. 20 मार्च अखेर कार्यान्वित होत आहे. दरम्यान, गेली अनेक वर्ष रखडलेली हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेतील धनगरवाडी टप्पा क्रमांक एकचे आज टेस्टिंग करून पाणी बाहेर काढण्यात आले.
धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोनबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार असून टप्पा क्रमांक दोनची स्थापत्य विद्युत व यांत्रिकीची सर्व कामे २५ डिसेंबर अखेर पूर्ण करून योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी आज हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेतील धनगरवाडी टप्पा क्रमांक एकचे यशस्वीपणे टेस्टिंग करून पाणी बाहेर काढण्यात आले.
भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण झालेले असून याच पद्धतीने टप्पा क्रमांक दोन लवकरात लवकर पूर्ण होणार अशी अशा शेतकऱ्यांना वाटू लागल्या आहेत.