साताऱ्यातील ‘या’ भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महावितरणच्या शेंद्रे उपकेंद्रात बिघाड झाल्याने मंगळवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहापूर योजनेचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारच्या सत्रातील यशवंत गार्डन टाकी माध्यमातून पाणीपुरवठा होणार नाही. याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्युत पुरवठा बंद असल्याने पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. महावितरणला विजेचे काम पूर्ण करण्यासाठी मंगळवारी ७ ते ८ तासाचा – कालावधी लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी यशवंत गार्डन टाकी माध्यमातून पाणीपुरवठा होणार नाही.

बुधवार दि. ३ जुलै रोजी सकाळ सत्रातील शहापूर उद्भव योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकी या टाक्यांना पाणीपुरवठा कमी दाबाने अथवा न होण्याची शक्यता आहे. शहापूर योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून पालिकेस सहकार्य करावे, असे, आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.