सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे; 8 तालुक्यांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात एकूण ११ तालुक्यांची संख्या आहे. या तालुक्यांपैकी ८ तालुक्यांत सद्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पिके माना टाकू लागली आहे. जलसाठे आटू लागल्याने प्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिले जात आहे. पिण्याची पाण्यासाठी टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्च अखेरीस जिल्ह्यातील तब्बल आठ तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील १३७ गावे व ४३५ वाड्यावस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात ७५ टँकरद्वारे ५५ गावे ३५१ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यात २७ टँकरद्वारे ३१ गावे १०६ वाडीवस्तीवर, फलटण तालुक्यात १८ टँकरद्वारे २३ गावे ७२ वाड्या – वस्तींवर, कोरेगाव तालुक्यात २१ टँकरद्वारे २४ गावात, खंडाळा एका टँकरद्वारे १ गावात, वाई तालुक्यात दोन टँकरद्वारे दोन गावे तीन वाडीवस्तीवर, पाटण तालुक्यात तीन टँकरद्वारे तीन वाड्या-वस्तींवर, कराड तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात पाणीपुरवठा केला जात आहे.