सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लिकेज आसल्याने प्रचंड पाणीगळती सुरू झाली आहे. प्राधिकरणाकडून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केल्या जाणार्या सातारा शहर व उपनगर परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवार व शनिवारी विस्कळीत राहणार आहे.
सातारा शहर व उपनगरातील ज्या ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून लष्कर पाणी पुरवठा केंद्राद्वारे पाणीपुरवठा केला जातो. प्राधिकरणाच्या विसावा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये 450 मिमी व्यासाची मुख्य दाबनलिका फुटून पाणीगळती झाली आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
जलवाहिनीला गळती लागल्याने गुरूवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिनी दुरूस्तीसाठी दि. 18 रोजीचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. 19 रोजी संबंधित भागात सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.