नदीपत्रातील पाण्याच्या पाइप गेल्या वाहून गेल्यामुळे कराडातील पाणीपुरवठा ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने नागरिकांना पाणी पुरवठा होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी शहरातील नागरिकांवर मोठे जलसंकट उभे राहिले आहे. अचानक ही परिस्थिती उद्भवल्याने सोमवारी शहरात सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. येथील अडचण दूर करेपर्यंत जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित करून शहराला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी, लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

कराड शहरात पाणीपुरवठा प्रश्न उद्भवल्यानंतर मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, तसेच पालिकेच्या माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. कराडसह पाटण तालुक्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे नदीतील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. नदीपात्रातील पाणी वाढल्याने कराड शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वाहून गेली. हे पाणी पाइपलाइनद्वारे कोयना नदीच्या डाव्या तीरावरून वारुंजी गावातून आणली गेली. संबंधित पाइपलाइन पलाश मंगल कार्यालयापासून नदीच्या खालून आणली गेली आहे.

त्यातच महामार्गावर कोयना नदीवर नवीन पुलाच्या उभारणीसाठी भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे एकाच ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह तीव्र झाला असून या तीव्र प्रवाहामुळेच पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वाहून गेल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी म्हंटले आहे.