कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील अनेक भागात पाऊस पडत असताना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तरीही मागील 15 दिवसांत जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे काही गावांचे आणि अनेक वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले आहेत.
फलटण तालुक्यातही 10 गावे आणि 36 वाड्यांसाठी 12 टॅंकर सुरू आहे. यावर प्रत्येकी 15 हजार नागरिक आणि पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातीलही चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी आदी 6 गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. वाई तालुक्यात चांगला पाऊस होतो. पण, सध्या तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर गावासाठी टॅंकर सुरू आहेत.
शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात इतर पिके घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतः अनेक पिकांची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त या ॲपमध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
माण तालुक्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला असल्यामुळे टंचाईची स्थिती काही प्रमाणात कमी झालेली आहे. आठवड्यात टॅंकरची संख्या सहाने कमी झाली आहे. सध्या 61 टॅंकरने नागरिकांना तसेच पशुधनाला पाणीपुरवठा केला जातोय. तर लोकांना पाणीपुरवठा होण्यासाठी 19 विहिरी आणि 32 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. अधिग्रहण विहिरींची संख्या खटाव तालुक्यात सर्वाधिक आहे. तर जिल्ह्यात सध्या 1 लाख 34 हजार नागरिक आणि 83 हजार पशुधनासाठी टॅंकर सुरू आहेत.
57 हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार
सातारा जिल्ह्यात ११ तालुक्यांपैकी माण तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती अधिक आहे. 47 गावे आणि 344 वाड्यांतील 73 हजार नागरिक आणि 57 हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी 61 टॅंकर सुरू आहेत. तर तालुक्यातील पांगरी, वडगाव, मोगराळे, पाचवड, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, मार्डी, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, इंजबाव, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना आणि त्या अंतर्गत वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
खटाव तालुक्यातील 21 गावे आणि 24 वाड्यांत टँकर सुरु
जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील 21 गावे आणि 24 वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. या टॅंकरवर 29 हजार नागरिक आणि 8 हजार 249 जनावरांची तहान अवलंबून आहे. यासाठी 14 टॅंकर सुरू आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.