सातारा जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस; सर्व धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. कोयना धरणाप्रमाणेच इतर धरणामध्ये मुबलक पाणी आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये एकूण 72.19 अब्ज घन फूट पाणी साठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 48.49 टक्के इतका असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा पुढीलप्रमाणे-

मोठे प्रकल्प –

कोयना –46.67 अब्ज घन फूट (46.61 % धरणसाठा टक्केवारी )
धोम – 5.69 अब्ज घन फूट (48.67 % धरणसाठा टक्केवारी)
धोम – बलकवडी – 3.35 अब्ज घन फूट (84.60 % धरणसाठा टक्केवारी)
कण्हेर –4.7 अब्ज घन फूट (42.44 % धरणसाठा टक्केवारी)
उरमोडी – 4.40 अब्ज घन फूट (45.60 % धरणसाठा टक्केवारी)
तारळी – 4.64 अब्ज घन फूट (79.45 % धरणसाठा टक्केवारी).

मध्यम प्रकल्प –

येरळवाडी – 0.0024 अब्ज घन फूट (0.35 % धरणसाठा टक्केवारी)
नेर – 0.08 अब्ज घन फूट (19.47 % धरणसाठा टक्केवारी)
राणंद – 0.01 अब्ज घन फूट (4.42 % धरणसाठा टक्केवारी)
आंधळी – 0.06 अब्ज घन फूट (22.14 % धरणसाठा टक्केवारी)
नागेवाडी – 0.06 अब्ज घन फूट (26.67 % धरणसाठा टक्केवारी)
मोरणा – 0.92 अब्ज घन फूट (70.46 % धरणसाठा टक्केवारी)
उत्तरमांड – 0.32 अब्ज घन फूट (37.33 % धरणसाठा टक्केवारी)
महू – 0.83 अब्ज घन फूट (76.42 % धरणसाठा टक्केवारी)
हातगेघर – 0.08 अब्ज घन फूट (31.16 % धरणसाठा टक्केवारी)
वांग (मराठवाडी) – 1.01 अब्ज घन फूट (37.13 % धरणसाठा टक्केवारी) या प्रमाणे पाणीसाठा आहे.

कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 150 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 107 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 18 मि.मी., धोम – बलकवडी – 94, कण्हेर – 27, उरमोडी – 41, तारळी – 56, येरळवाडी – 3, उत्तरमांड – 40, महू – 52, हातगेघर – 52, वांग (मराठवाडी) – 35, नागेवाडी-19 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.