सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या काही बभगत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहेत. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सातारा शहराच्या पश्चिमेकडील रामाचा गोट, मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ हा भाग ८ महिन्यांपासून पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ही समस्या संपुष्ठात आलेली नाही. आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास दि. ८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी
उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी नुकतेच मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, रामाचा गोट, मंगळवार तळे, अनंत इंग्लिश स्कूल व व्यंकटपुरा पेठ या भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. आठ महिन्यांपासून येथील नागरिकांना कधी कमी दाबाने तर कधी अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी यासाठी पाणीपुरवठा विभागाला लेखी व तोंडी तों सूचना केल्या.
तरी देखील कोणतेही उपाय करण्यात न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसांत पाणी पुरठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करुन नागरिकांची परवड थांबवावी, अन्यथा दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अनंत इंग्लिश स्कूल चौकात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशाराही अविनाश कदम यांनी दिला आहे.