कराडच्या बुधवार पेठेतील भाजी मंडई हलवा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू; नागरिकांसह डॉक्टरांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील बुधवार पेठेतील जुना पटेल दवाखाना ते औंधकर हॉस्पिटल पर्यंतच्या भाजी मंडईवरून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजीमंडई तत्काळ हटवावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा दिला.

कराड येथील बुधवार पेठेतील रस्त्याकडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांना तसेच येथील डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा कारवाई करण्याची मागणी करून देखील पालिका प्रशासनाकडून दूर;दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी आज मुख्याधिकाऱ्यांची पालिकेत जाऊन भेट घेतली. तसेच मागण्यांचे त्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देखील दिला.

यावेळी अभिषेक भोसले, डॉ. किशोर पटेल, डॉ. दिलीप मोहोळकर, डॉ. यादव, अनंत लादे, जयवंत लादे, दत्तात्रय दुपाटे, संजय कांबळे, सचिन आढाव, राकेश थोरवडे, नितीन पटेल, राजेश पटेल, आवदूत सोनवले, मयूर थोरवडे, महेंद्र माने, दिपक पटेल, प्रतिक कांबळे आणि नागरिक व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आहे. कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये. कारण या ठिकाणी डॉक्टर मोहोळकर हॉस्पिटल डॉक्टर पटेल क्तिनिक डॉक्टर यादव हॉस्पिटल आणि औंधकर हॉस्पिटल ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे जे या वरील हॉस्पिटलमध्ये पेशंट पेतात त्यांना हॉस्पिटलमध्ये येतानाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे आणि गाठ्यां वरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे भाजी मंडईत ट्राफिक जाम होत आहे.

याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन टेम्पो या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातीत व्यक्तींना ये जा करता येत नाही. तसेच त्या भागातील अर्धा भाग हा 1P आणि गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे. त्याभागात जर अचानक रुग्ण आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गाभीर्यपूर्वक दखल घ्यावी. या अनुषंगाने बुधवारपेठ मधील सामाजिक कार्यक्रत्यांनी गेली एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केलेला आहे तरी याची दखल घेतली नसल्यामुळे गुरुवार दि. 26 सप्टेंबर रोजी मुखगधिकारी यांच्या दालानाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत, अशा इशारा निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे.