लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

व्हरकट हे गेली अनेक वर्षांपासून गावातून जाणाऱ्या आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडीत सहभागी असायचे. यावर्षी देखील ते दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. आज लोणंद येथे पहाटे उठल्यानंतर प्रार्थविधीसाठी जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून चालले होते.

रूळ ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेला ते जोरात धडकले. रेल्वेला धडकतात ते बाजूला फेकले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती इतर वारकऱ्यांनी रेल्वे पोलिसांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस अपघातस्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी वारकरी व्हरकट यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला व अपघाताची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, 3 भाऊ, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे.