जिल्ह्यात 2 हजार 418 वृध्द व दिव्यांग मतदारांच्या मतदानाची मोहिमा सुरु; प्रशासनाकडून गृह भेटीतून योग्य नियोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग असे जे मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती राहू शकत नाहीत त्यांना गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठी मतदारांचा नमुना 12 ड मध्ये मागणी अर्ज घेण्यात आला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या निवडणूक विभागाच्या मतदान पथकाकडून या मतदारांच्या घरी भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४१८ मतदारांसाठी दि. ७ ते १३ नोव्हेंबर दरम्यान हे मतदान आयोजित केले आहे.

वाईतील १३९ मतदारांनी बजावला हक्क…

वाई विधानसभा मतदार संघामध्ये ८५ वर्षावरील १२८ वृध्द व २० दिव्यांग मतदारांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय निवडला होता. यापैकी ४ मयत असून ५ मतदार घरी आढळले नाहीत. त्यांना मतदानासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. १३९ मतदारांचे गृहभेटीद्वारे दि. ७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले आहे. मतदान पथकाने या मतदारांच्या घरी भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली. या सर्व प्रक्रियेचे मतदानाच्या गोपनियतेचा भंग होणार नाही, या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आहे.

मतदानाच्या गोपनियतेचा भंग होऊ नये यासाठी चित्रीकरण

विधानसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग मतदार बांधवांच्या मागणीनुसार तसेच त्यांनी केलेल्या अर्जानुसार त्याची नोंद घेत निवडणूक विभागाच्या मतदान पथकाकडून त्याच्या घरी जाऊन मतदान घेतले जात आहे. हि प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली जात असून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग टाळण्यासाठी सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण देखील केले जात आहे.

जिल्ह्यात 3 हजार 165 मतदान केंद्र

सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरी भागात एकूण 3 हजार 165 मतदान केंद्र आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुरक्षा अबाधित राहण्यासाठी 165 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 3 हजार 573 पोलीस, 3 हजार 471 होमगार्ड, 6 राज्य राखीव पोलीस बल कंपनी, 4 केंद्रीय निमलष्करी बल कंपनी इतक्या मनुष्यबळाचा वापर करण्यात येणार आहे. एरीया डॉमीनेशन व रुट मार्च करीता 18 ऑक्टोबर रोजीपासून सीमा सुरक्षा बलाच्या 2 कंपनी उपलब्ध होणार आहेत. निवडणूक कालावधीत कायदा व सुरक्षा अबाधित राहण्याकरीता मतदान केंद्र, परिसर आदी बंदोबस्ताशिवाय पोलीस सेक्टर पेट्रोलिंगचे नियेाजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात मतदान संघ निहाय एकूण 143 पोलीस क्षेत्रीय पेट्रोलिंगचे नियोजन करण्यात आले आहे.