सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा चार तासात १८.७२ टक्के मतदान झाले. तर कोरेगावात चुरशीने मतदान सुरू असून २१.२४ टक्के मतदान झाले आहे. तर दुपारी 1 वाजेपर्यंत २५५ फलटण : 33.81, २५६ वाई : 34.42, २५७ कोरेगाव : 38.29, २५८ माण : 29.69, २५९ कराड उत्तर : 35.47, २६० कराड दक्षिण : 36.58, २६१ पाटण : 34.97, २६२ सातारा : 35.76 इतके टक्के मतदान पार पडले. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदार संघात झाले तर सर्वात कमी माण मतदार संघात झाले.
सातारा जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सकाळी ७ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासात सकाळी ७ ते ९ या वेळेत फलटणला ४.२९ टक्के, वाई ४.९२, कोरेगाव ६.९३, माण ३.३८, कराड उत्तर ४.८४, कराड दक्षिण ५.६३, पाटण ६.६८, सातारा ६.१८ टक्के मतदान झाले. सकाळी ९ ते ११ या वेळेत १८.७२ टक्के मतदान झाले. फलटणला १७.९८ टक्के, वाई १८.५५ , कोरेगाव २१.२४, माण १५.२१, कराड उत्तर १८.५७, कराड दक्षिण १९.७१, पाटण १८.९३, सातारा १९.९७ टक्के मतदान झाले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात अनंत इंग्लिश स्कूल येथील केंद्रावर तर आमदार शिवेंद्रराज भोसले यांनी कोटेश्वर येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील तब्बल ५७ जणांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तरीही महाविकास आघाडी आणि महायुतीतच खरा सामना आहे. सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १०९ जण निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३ लाख ३७ हजार ०७२ पुरुष तर १३ लाख ०५ हजार ६०८ महिला मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या ११४ आहे. असे २६ लाख ४२ हजार ७९४ मतदार आज बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ मतदान टक्केवारी वेळ : 1.00
२५५ फलटण : 33.81, २५६ वाई : 34.42, २५७ कोरेगाव : 38.29, २५८ माण : 29.69, २५९ कराड उत्तर : 35.47, २६० कराड दक्षिण : 36.58, २६१ पाटण : 34.97, २६२ सातारा : 35.76