सातारा जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदानास सुरुवात; 3 हजार 165 मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सदर मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. मतदानासाठी सेक्टर ऑफिसर ४३६, केंद्राध्यक्ष ३ हजार ९५६ व इतर कर्मचारी ११ हजार ८६९ असे एकूण १६ हजार २६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान प्रक्रिया पार पाडत असून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ३०९७ पोलिस कॉन्स्टेबल, तसेच २९४० होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ, तर राज्य राखीव दलाची एक तुकडी नेमण्यात आली आहे. संवेदनशील ४८ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही वॉच राहणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष पथकांचाही वॉच ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सर्वांनी सहकुटूंबाने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. यावेळी मतदान केंद्रांवर प्रशासनातर्फे केलेल्या सूविधांची माहिती दिली.

जिल्ह्यातील मतदार एकूण मतदार :

२६ लाख ४२ हजार ७९४

पुरुष : १३,३७,०७२

महिला : १३,०५,६०८

तृतीयपंथी मतदार : ११४

जिल्ह्यात मतदारसंघ : ८

३१६५ मतदान केंद्रे