रहिमतपुरात शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून रॅलीसह मानवी साखळीद्वारे मतदान जागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियानातंर्गत रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,आणि कन्या प्रशाला रहिमतपूर यांच्या सहयोगाने मतदान जनजागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीचे रहिमतपूर शहरात आयोजन करण्यात आले. ‘आपल्या मतामुळे होणार आहे लोकशाहीचा सन्मान, अवश्य करा मतदान’ असे संदेश फलक घेऊन रॅली काढण्यात आली होती.

कराड 259 उत्तर विधानसभा मतदार संघात उंब्रज, तळबीड येळगाव, वाघेश्वर येथे विविध शाळांमध्ये मानवी साखळी तयार करून मतदान शप्पथ, घोषणा देऊन मतदान जनजागृती करण्यात आली आहे. चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या., नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची दिशा., आपले मत आपले भविष्य., ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर., मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा आशयाची विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांमार्फत येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

studant

दरम्यान, महाबळेश्वर येथे २५६ वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मंगळवारी स्वीप अंतर्गत गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,महाबळेश्वर येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.