कराड प्रतिनिधी । कराड आरटीओ कार्यालय व कराड दक्षिण स्वीप पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मतदान जागृती करण्यासाठी मोटार वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आरटीओ कार्यालयाची तब्बल 25 वाहने सहभागी झाली होती.
सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वृंदा गुरावे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी कराड दक्षिण स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, सचिन चव्हाण उपस्थित होते. कराड आरटीओ कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली मतदान जागृती करत जुन्या पुलावरून कराडमध्ये प्रविष्ट झाली.
यानंतर दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, कृष्णानाका मार्गे ही रॅली मतदान जागृती करत परत दत्त चौकात आली, आणि नंतर कोयना जुन्या पुलावरून आरटीओ कार्यालयाकडे गेली. आरटीओ कार्यालय कराड व स्वीप पथक यांच्या माध्यमातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक शिरीष पोकळे, सुरेश आगवणे, सागर विश्वासराव, समीर सावंत, प्रसन्ना पवार, तृप्ती निकम, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रजनी पाटोळे, शिवानी सगरे, ज्योती घुले, सचिन बिटले, सौरभ कोळी, विनोद सूर्यवंशी, भारत गोरड, अमोल कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या मोटार रॅलीत कराड, पाटण ड्रायव्हिंग स्कूलची वाहने उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.