विद्यार्थ्यांकडून आकाश कंदीलातून मतदान जनजागृतीचा संदेश; जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला. मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले. त्यानंतर शाळेतील 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील बनवून मतदान जनजागृती केली.

मतदान जनजागृती साठी बऱ्याच शाळामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा अशा एक ना अनेक विविध स्पर्धा, शाळांमध्ये राबवल्या जातात परंतु त्या स्पर्धा शाळेपुरत्या मर्यादित राहतात. ग्रामीण भागातला हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे. नुकतीच दिवाळीमुळे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या आकाश कंदील घरोघरी लागतील. त्याचबरोबर मतदान जनजागृती संदेश घरोघरी तर पोह्चतीलच पण शेजारी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते संदेश पाहायला मिळतील.

शाळेतील या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सदस्य व सर्व पालक शाळेचे मुख्याध्यापक दादा कट्टे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे ,शिक्षण विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख सौ. शोभा पवार सर्वांनी परिश्रम घेतले.