सातारा प्रतिनिधी | ‘स्वीप’अंतर्गत फलटण, जिल्हा सातारामार्फत घिगेवाडी, ता. कोरेगाव येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतमजुरांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत महत्त्वाचे असून बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याबाबत स्वीप नोडल अधिकारी फलटण सचिन जाधव यांनी आवाहन केले.
यावेळी ‘मतदानासाठी वेळ काढा! आपली जबाबदारी पार पाडा!’, ‘आपले मत आपले भविष्य’, ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, अशा घोषणा देत मतदान जनजागृती उपक्रम स्वीप टीमकक्ष, फलटणमार्फत घेण्यात आला.