सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील 7 सहकारी संस्थांचा संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक येणाऱ्या काळात होणार आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी सदर सहकारी संस्थाच्या प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थेच्या नोटीस बोर्डावर 18 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप असतील तर त्यांनी 24 जानेवारी 2024 पर्यंत या कालावधीमध्ये या कार्यालयात स.11.00 ते दु. 3-00 या वेळेत उचीत त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात देण्यात यावे, असे आवाहन तालुका सहकारी अधिकारी शंकर पाटील यांनी केले आहे.
हनुमान सहकारी पाणी पुरवठा मर्या अतित, ता. जि. सातारा, श्री केदारेश्वर कालवा पाणी वापर संस्था लि. ठोसेघर, ता.जि. सातारा, जय जिजाऊ महिला सहकारी संस्था मर्या, औदुंबर अपार्टमेंट, रामाचा गोट, सातारा, राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले बचतगट बहुउददेशीय सहकारी संस्था मर्या, सातारा, यशवंत स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था मर्या, 523 करंजेपेठ, सातारा, अजिंक्यतारा सहकारी कृषी औद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्था मर्या, शाहूनगर- शेंद्रे, ता.जि.सातारा व सातारा तालुका बीज उत्पादक सहकारी प्रक्रिया संस्था शिवथर, ता. जि. सातारा, या सहकारी संस्थांची प्रसिध्द करण्यात आली आहे.