कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकाकडून मतदार जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील अपशिंगे, ता. कोरेगांव येथे कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली. यावेळी आपल्या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मतदान करण्याचा घटनात्मक अधिकार सर्वांनी बजावावा, असे आवाहन कराड उत्तर विधानसभा स्वीप पथकाच्या मध्यवर्ती अधिकारी प्रतिभा लोंढे यांनी केले.

स्वीप पथकाचे सहाय्यक मध्यवर्ती अधिकारी डॉ. महेंद्र भोसले म्हणाले, मतदार राजा हा मतदानाच्या पेटीतून भारत देशातील नेतृत्व व आवडत्या पक्षाची निवड करत असतो. हेच नेतृत्व देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाते. म्हणून सर्वांनी मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे जाणून २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यास बहुसंख्येने घराबाहेर पडावे असे आवाहन केले.

कराड उत्तर विधान विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे व डॉक्टर जस्मिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा लोंढे, डॉ. महिंद्र भोसले, गोविंद पवार, अनिल काटकर, काजल कुंभार, प्रदीप बंडगर उपक्रम राबवत आहेत.