मुंबई बाँबस्फोटातील आरोपी समीर हिंगोराच्या फर्न हॉटेलनंतर विशाल अग्रवालच्या MPG क्लबलाही ठोकलं टाळं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | देशभरातील पर्यटकांची आवडती पर्यटनस्थळं असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीत अनाधिकृत बांधकामांनी कळस गाठला आहे. या बांधकामांना आता सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिलाय. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी, चित्रपट निर्माता समीर हिंगोराची पार्टनरशीप असलेल्या पाचगणीतील फर्न हॉटेलनंतर शनिवारी बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लाबलाही टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या नंदनवनातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ec6f46be 8f91 4aa6 97d4 2af8a183f904

कोण आहे समीर हिंगोरा

पाचगणीतील फर्न हॉटेलमध्ये पार्टनरशीप असलेला समीर हिंगोरा हा १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोप आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला एके-५६ रायफल पुरवल्याप्रकरणी दोषी धरून टाडा कोर्टानं त्याला ९ वर्षांची सश्रम कारावास आणि २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी हिंगोरानं संजय दत्तसोबत सनम चित्रपटाची निर्मिती केली होती.

अचानक झालेल्या कारवाईचा पर्यटकांना मनस्ताप

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. अशातच अनाधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देताच प्रशासनाने अनाधिकृत बांधकामे असणाऱ्या मिळकती सील करायला सुरूवात केली. पाचगणीतील फर्न हॉटेल सील केल्यानंतर पर्यटकांना हॉटेल सोडावं लागलं. अचानक झालेल्या कारवाईमुळे पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनावर पर्यटकांनी संताप व्यक्त केला.

अग्रवालच्या एमपीजी क्लबला ठोकलं टाळं

सलग दोन दिवस प्रशासनाने दोन मोठ्या हॉटेलला सील ठोकल्यानं महाराष्ट्राच्या नंदनवनात खळबळ उडाली आहे. पाचगणीनंतर प्रशासनाने शनिवारी सकाळी विशाल अग्रवालचं महाबळेश्वरातील एमपीजी क्लब हॉटेल सील केलं. हॉटेल सील करण्यात आल्याची नोटीस डकविण्यात आली आहे. प्रातांधिकाऱ्याऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीन ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे विशाल अग्रवालला मोठा झटका बसला आहे.