विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन; शासकीय भाड्याच्या जागेत उभारलं अनाधिकृत पंचतारांकित हाॅटेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने या दोघांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कनेक्शन असल्याची माहिती समोर आली असून विशाल अग्रवालने महाबळेश्वर येथील शासकीय भाड्याच्या जागेत अनाधिकृत पंचतारांकीत हाॅटेल उभारले असल्याचा आरोप करण्यात आल्याने अकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरवर मधील एक शासकीय जागा भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी विशाल अग्रवाल यांनी पंचतारांकित हॉटेल सुरू ठेवले आहे. एमपीजी क्लब हे विशाल अग्रवाल यांचे हॉटेल असून सरकारी जागेवर हे हॉटेल बांधलं आहे अनाई ते भाडेतत्वावर दिले आहे. या याठिकाणी सुरू असलेल्या बार विरोधात महाबळेश्वर पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर महाबळेश्वरपालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा बार बंद करण्याची आणि हाॅटेल सील करण्याचीमागणी करण्यात आली आहे

महाबळेश्वर येथे पारशी जिमखाना नावाचे क्लब, एक ट्रस्ट होती. या ट्रस्टच्या मालकीची हि पंचतारांकित असलेल्या हॉटेलची मिळकत आहे. २०२० साली विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हि मिळकत त्याच्या नावर केली. ट्रस्टची जागा त्यांच्या नावावर कशी झाली? ट्रस्टला क्लबची परवानगी होती.

या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट सुरु करण्यात आले असून ते अग्रवाल यांनी दुसऱ्याला भाडेतत्वावर दिलेले आहे. याबाबत महाबळेश्वर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ एप्रिल २०२४ रोजी पात्र देत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, याबाबत महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.