सातारा प्रतिनिधी । देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत नुकतीच एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षांमध्ये बराच वाद उफाळून आला आहे. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनी संसदेत केंद्रीय मंत्री शहांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी त्वरित माफी मागावी तसेच बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते आहे. देशात आंबेडकरांच्या नावावरून वाद सुरु असतानाच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची ओळख करून देणारी एक यादी सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ध्रुव राठीने हा फोटो X म्हणजेच ट्विटरवर शेअर केला असून त्याने सोबत “पॉवर ऑफ एज्युकेशन” असे लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असल्याचे पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आले आहे.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या यादीच्या फोटोमध्ये डॉ. आंबेडकरांची शैक्षणिक पात्रता दाखवून दिली गेली आहे. या फोटोमध्ये आंबेडकरांनी सातारा येथून प्राथमिक तर मुंबईमधल्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर आंबेडकरांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बीए करून पदवी प्राप्त केली आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविली. जिथे त्यांनी एमए आणि पीएचडी दोन्ही पूर्ण केले.
पुढे आंबेडकर युनायटेड किंगडम येथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेले आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रेज इन येथे प्रवेश घेतला. मात्र काही आर्थिक अडचणींमुळे त्यांना १९७१ मध्ये भारतात परतावे लागले होते. वर्ष १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आंबेडकरांना राज्यसभेचे साड्यास म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि याचवर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट तसेच हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती.
Power of Education 💙 #BabaSaheb pic.twitter.com/RFJlF5pZux
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) December 19, 2024
साताऱ्यातील शाळेचा असा आहे इतिहास
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० साली सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. आज ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखली जाते. ही शाळा त्यावेळी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होती. सातारा सरकारी शाळा राजवाडा परिसरात एका वाड्यात भरवली जात असे. आजही हा वाडा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थमिल शिक्षणाची साक्ष देत आहे.
हा वाडा १८२४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार प्रतापसिंहराजे भोसले यांनी बांधला. त्यावेळी राजघराण्यातल्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था या वाड्यात केली जायची. १८५१ साली हा वाडा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला. आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे सेवानिवृत्त झाल्यावर साताऱ्यात लष्करी भागात वास्तव्यास होते. १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. आंबेडकरनगर या लष्करी छावणीत रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे अपत्य. बाळाचे नाव भिवा ठेवल होत. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित आहेत. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.
साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांचे आडनाव “सकपाळ” असताना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये “आंबडवेकर” असे आडनाव नोंदवून सहा वर्षांच्या भिवाने प्रवेश घेतला. या शाळेत आंबेडकरांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे ‘आंबेडकर’ असे झाले.
नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण होऊन डिसेंबर १९०४ महिन्यातच रामजी मुंबईला सहपरिवारासह गेले. मुंबईतील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या खोलीत राहू लागले. भीमराव हे मुंबईमधील एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. शाळेला शंभर वर्षं झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचं नामकरण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असं करण्यात आलं. आज प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १२० आहे.