तुळशी वृंदावन धरणाचे ग्रामस्थांनी केले जलपूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोणंद व खेड बुद्रुक गावाच्या सीमेवर असणारे तुळशी वृंदावन धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाण्याचे जलपूजन लोणंद व खेड बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने खेड बुद्रुक व लोणंद गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

तुळशी वृदांवन धरणातील पाणी पूजनप्रसंगी ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, नगराध्यक्षा सीमा खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, सभापती सुनील शेळके, विनोद क्षीरसागर, लक्ष्मणराव शेळके, अॅड. सुभाषराव घाडगे, भरत शेळके, शिवाजीराव शेळके, बबनराव शेळके, अशोकराव धायगुडे, अॅड. गजेंद्र मुसळे, वैभव खरात,गणेश धायगुडे, नारायण धायगुडे, सुभाष ठोंबरे, रामदास हाके, सुनिल रासकर, किसन धायगुडे, दत्तात्रय धायगुडे आदी उपस्थित होते.

लोणंदच्या नगराध्यक्षा सीमा खरात, सुप्रिया शेळके, चंद्रभागा जवळे, भारती जवळे, रागिणी जवळे यांच्या हस्ते ओटी भरून जल पूजन करण्यात आले.

यावेळी तुळशी वृंदावन धरणामध्ये आ. मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धोम बलकवडीच्या कालव्यातून तुळशी वृंदावन धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी मोलाची मदत झाली. त्यातच पावसाने साथ दिल्याने तुळशी वृंदावन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.