सातारा प्रतिनिधी | आपण आजवर अनेक गावच्या अनेक भाकडकथा ऐकल्या असतील. त्यावर विश्वास देखील ठेवला असेल मात्र, किती खरं आणि किती खोटं हे मात्र, कुणालाच माहिती पेट नाही. या गावाप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील असच एक गाव आहे की, त्या गावातील गुडी पाडव्याच्या तिसऱ्या दिवसापासून गावच्या बेर जाऊन देवीच्या मंदिरात राहतात. ते गाव आहे सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातील मेढ्याच्या दक्षिणेला सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या साडेचारशे लोकसंख्यच गोंदेमाळ हे गाव होय.
गोंदेमाळ या गावामधील ग्रामस्थ गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी गाव सोडून शेजारच्या म्हाते बुद्रुक येथील मंदिरात जातात. तेथेच पाच दिवस मुक्काम करतात. ही प्रथा कित्येक वर्षांपासून चालत आली असून ती जपली जात आहे. पूर्वी गोंदेमाळ गावात प्रत्येक कुटुंबात वंश वाढत नव्हता. प्रत्येकाला एक एक अपत्यच होत होती. यावेळी देवाला नवस केल्यानंतर या गावच्या लोकांनी गावच्या वेशीबाहेर गेलेत तरच तुमचा वंश वाढत जाईल. म्हणून गोंदेमाळचे पूर्वज यांनी पाडव्याच्या नववर्षारंभापासून गाव सोडायची प्रथा सुरू केली. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गावात देवीची छोटीशी यात्रा भरते.
या यात्रेत सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाव सोडून जायचे आहे. यावर सर्वांचे एकमत होऊन तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी गाव सोडून सर्वजण म्हाते ब्रुद्रुक या गावच्या नवलाई देवीच्या मंदिरात येऊन राहतात. तीन वर्षांतून एकदा गोंदेमाळ गावचे सर्व ग्रामस्थ हे स्वतःहून गाव सोडून शेजारच्या गावात मुक्कामी येतात. येताना सर्व जीवबरोबर घेऊन येतात. बैल, गाय, म्हैस, कोंबड्या, शेळी, मेंढर, कुत्रीमांजर हे घेऊन येतात. गाव ओसाड झाला पाहिजे. याची खबरदारी घेतात. येताना सर्वांचे अन्नधान्य, कपडालत्ता, गवतचारा बरोबर घेऊनच येतात. आजपर्यंत एकदाही चोरीमारी झाली नाही. गुरेढोरे ही इकडे तिकडे पळणारे प्राणी असूनही हे गाव सोडताना ओळीने येतात.
म्हाते बुद्रुक ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असते. दरम्यान, याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर हे रात्रीचे आपल्या सहकार्यासह गोंदेमाळेत गेले होते. ग्रामस्थांनी त्यांना कसल्याही विरोध केला नाही. शेवटी दाभोलकर व अंधश्रद्धा समितीचे कार्यकर्ते रात्रीचे दोन वाजता ते परत गेले.