सातारा जिल्ह्यातील महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव माहितीय का? जिथे घराच्या दारात अन् अंगणात उमलतात फुलंच फुलं!

0
643
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संतोष गुरव

सातारा जिल्ह्यात यापूर्वी आपण मधाचे मांघर गाव, पुस्तकांचे गाव भिलार आणि फळांचे गाव पाहिलं असेल मात्र, आता जिल्ह्यात फुलांचे गाव (Rose Village) तेही गुलाबाच्या फुलांचे गाव उदयास येत आहे. गुलाबाच्या फुलाने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावाला एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील पारपार (Parpar village) या गावाने महाष्ट्रातील अन् जिल्ह्यातील पहिले गुलाबाचे गाव असा नावलौकिक मिळवला आहे.

सातारा जिह्यातील पारपार गाव हे छोटेसे महाबळेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. या गावाला आता गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली असून गावात साधारणतः दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे. या गावास गुलाबाच्या फुलांची संकल्पना ही सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मांडली आणि ग्रामपंचायत पारपारने ती स्वीकारली.

पारपार गावाच्या या नव्या ओळखीमुळे, पुस्तकांचे गाव भिलार आणि मधाचे गाव मांघर यांच्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील हे तिसरे विशेषत्व प्राप्त करणारे गाव ठरले आहे. गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच, गुलाबांच्या लागवडीमुळे पर्यावरणीय आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुलाबांच्या फुलांचे उत्पादन आणि विक्री स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते, तसेच पर्यटकांच्या वाढीमुळे गावातील रोजगाराच्या संधी वाढू शकतात. पारपार गावाच्या या उपक्रमामुळे, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे, जो इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

फळांचे गाव धुमाळवाडी

फलटण जिल्हा सातारा पासून 20 किलो 18 किलो मीटर अंतरावर असलेले फलटण च्या दक्षिण दिशेला असलेल्या धुमाळवाडी गावात 19 प्रकारची फळे सलग व 6 प्रकारची फळं झाडे बांधावर अशी एकूण 26 प्रकारचे फळझाडे लागवड या ठिकाणी केलेले आहेत. हे गाव आता फळांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव

महाबळेश्वर परिसरातील मांघर हे गाव देशात मधाचे गाव म्हणून ओळखले जाणारंय..राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मधाचे गाव नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे..यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आलीय. मांघर गावात 80 टक्के लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात.

पुस्तकांचे गाव भिलार

कधीकाळी स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे गाव जगातील दुसरे तर भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव ठरलेय. तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राबवलेल्या संकल्पनेमुळे या गावाला नवीन ओळख मिळाली आहे. सातारा जिह्यातील महाबळेश्वर, पाचगणीच्या मध्ये वसलेलं भिलार हे ठिकाण आहे. या गावाला पहिले स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भिलार गावात पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबवली.