सातारा प्रतिनिधी | सातारा शहर भाजपच्या वतीने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन लोकसभा मतदानाची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली आहे.
आत्ताची परिस्थिती पाहता, उन्हाचा तडाखा वाढला असून, उष्माघाताने अनेक नागरिकांना खूप त्रास होत आहे, अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, सातारा लोकसभेची मतदानाची तारीख सात मे आहे आणि मतदानाच्या तारखे पर्यंत उन्हाचा तडाखा आणखीन वाढण्याचा वाढून, दुपारच्या वेळी मतदार, मतदान करण्यासाठी बाहेर पडतील याची शक्यता नाही,आणि या मुळे मतदान कमी होण्याची शक्यता आहे या सर्व बाबींचा विचार करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यावे या साठी, मतदानाची वेळ ही संध्याकाळी सात पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली
तसेच उष्माघातापासून वाचण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर, प्रथमोपचार पेटी, छत्र्या , पिण्याच्या पाण्याच्या थंड बाटल्या किंवा मोठे जार आणि ग्लास तसेच ओआरएसची पाकिटे यांची व्यवस्था करावी, प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचारा साठी तज्ज्ञ किंवा शिकावू डॉक्टरची व्यवस्था करावी, मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये, यासाठी तात्पुरत्या तंबूची, मंडपाची व्यवस्था करावी आणि मतदान केंद्राच्या गेट पासून मतदान केंद्राच्या खोली पर्यंत कारपेट टाकण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सुद्धा भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली
उपजिल्हाधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुद्धा सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त सोयी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे उपस्थित होते.