रयत संस्थेच्या सचिवपदी विकास देशमुख तर संघटकपदी डॉ. अनिल पाटील यांची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची तर संघटकपदी माजी चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्वानुमते निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आले. संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना पदाधिकारीपदी संधी मिळाली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संस्थेचे पदाधिकारी हाेण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे ९ मे २०२३ रोजी कर्मवीर पुण्यतिथी दिनी झालेल्या बैठकीत संस्थेच्या कार्याध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची निवड शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली करण्यात आली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या संघटकपदी डॉ. अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. अनिल पाटील हे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी संस्थेत कार्याध्यक्षपद भूषविले आहे. संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्वसाधारण सभेस संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, आमदार विश्वजीत कदम, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे पदाधिकारी ज्ञानदेव मस्के, बंडू पवार, शिवलिंग मेणकुदळे तसेच मॅनेजिंग कौन्सिलचे अन्य सदस्य उपस्थित होते.