कालगाव बेलवाडी चिंचणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘कालभैरव’ पॅनेलचा विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कालगाव बेलवाडी चिंचणीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कालभैरव जय हनुमान शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी 9/0 असा विजय संपादन केला. सर्व विजयी उमेदवारांची पॅनेलच्या कार्यकर्त्याच्या वितीने गुलालाची उधळण करत गावातून मिरवून काढण्यात आली.

यावेळी पॅनेल प्रमुख कराड पंचायत समिती माजी सदस्य रमेश चव्हाण भाऊ, ज्येष्ठ नेते दिलीप दादा चव्हाण, माजी सरपंच डाॅ. शंकरराव पवार व जयवंतराव चव्हाण बापु यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार उभे करण्यात आले होते. यावेळी सर्वच्या सर्व उमेदवारांनी 9/0 असा विजय प्राप्त केला.

वार्ड क्रमांक १ मधून अरविंद शामराव गायकवाड, किसन मारुती फडतरे आणि स्त्री राखीव गटातून रत्नमाला आनंदा फडतरे, वार्ड क्र.२ मधून तानाजी मुगुटराव जाधव आणि महेंद्र सोपान पवार तर स्त्री राखीवमधून उषा अरुण चव्हाण आणि वार्ड क्र. ३ मधून धनाजी शिवाजी चव्हाण, राजेंद्र पांडुरंग चव्हाण तर स्त्री राखीवमधून द्रौपदा अशोक जाधव हे उमेदवार विजयी झाले.

पंचवार्षिक निवडणुकीत कालभैरव जय हनुमान शेतकरी विकास पॅनेलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. तर इतर आठ उमेदवार विजयी झाले. सर्व उमेदवारांची कालगाव ग्रामस्थांच्या वतीने गावातून गुलालाची उधळण करत मिरवून काढण्यात आली. निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाचे आभार मानले.