सातारा प्रतिनिधी । राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व वाहनांवर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अजूनही ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांना बसवावी लागणार आहे. ३० एप्रिल २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा तुमच्याकडून ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. हा दंड जर वाचवायचा असेल तर 531 रुपयांमध्ये HSRP नंबर प्लेट बसवून घेणे फायद्याचे ठरणार आहे. सातारा जिल्ह्यात देखील परिवहन विभागाच्यावतीने दुचाकी तसेच चारचाकी वाहन धारकांना नंबरप्लेट बसवून घेण्याचे निर्देश देण्यात आले असून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
दि. १ एप्रिल २०१९ नंतरच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आधीच बसवलेली आहे. त्यामुळे या वाहनांना बसवण्याची गरज नाही. एचएसआरपी नंबर प्लेट्स या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या आहेत. त्यावर एक वेगळा रंग असतो आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबरदेखील असतो. या प्लेट्स लगेचच ओळखल्या जातात. सध्या सातारा जिल्ह्यात याची’ एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्यासाठी दिले गेलेल्या सेंटरवर गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
काय आहे HSRP नंबर प्लेट
HSRP नंबर प्लेट ही अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात येतात. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. वाहनाचे इंजिन व चेसीसचा नंबर लिहिला जातो. नंबर युनिक असून, प्रेशर मशीनने लिहिला जातो.
नंबर प्लेट काढण्यासाठी हि गोष्ट करा
तुम्हाला देखील एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1125/HSRP वर भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी 3 करावी लागेल. यानंतर फिटमेंट सेंटवर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला अधिकृत 3 विक्रेत्यांकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. एचएसआरपी नंबरसाठी ऑनलाइन अर्ज करताना वाहनाचे सर्व डिटेल्स लागतात. त्यामुळे वाहनाचे आरसी बुक असणे गरजेचे आहे.
कोणत्या वाहनांना बंधनकारक
२०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांना नंबर प्लेट बंधनकारक आहे. ३१ एप्रिलपूर्वी नंबरप्लेट बसवली नाही तर दंड ठोठावला जाणार आहे. नंबर प्लेटमध्ये छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, वाहन चोरीचा धोका कमी होणे, यासाठी नंबर प्लेट बसवणे गरजेचे आहे.