कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील श्री. समर्थ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याचा शनिवारी बाल आनंद बाजार पार पडला. सकाळी 8 ते 11 या वेळेत बाल आनंद बाजाराचे गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री समर्थ हायस्कूलमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. जे. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना खरेदी – विक्री, नफा -तोटा, प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञान या बाबींची प्रत्यक्ष व्यवहारातून माहिती मिळावी व त्यामधून श्रमसंस्कार रुजवणे तसेच सांस्कृतिक रूढी परंपरांचे जतन करणे हा त्या मागील उद्देश आहे असे सांगत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. सोमनाथ चव्हाण व उपसरपंच योगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास पंचक्रोशीतील बहुसंख्य पालकांनी शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवून भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल विद्यालयामार्फत सर्व पालकांचे व मान्यवरांचे विशेष आभार मानण्यात आले.