वासोटा किल्ला आजपासून बंद; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे, गड,किल्ले आहेत. या ठिकाणी तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतात. जिल्ह्यातील महत्वाचा आणि घनदाट जंगलाचा दुर्गम वासोटा किल्ला हा पर्यटकांना नेहमीच खुणावतो. हा किल्ला आजपासून 16 ऑक्टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. बंद कालावधीत वासोट्यावर कोणी गेल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.

शिवसागर जलाशयाच्या पलीकडे सातारा जिल्ह्यातील घनदाट कोयना अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बामणोली परिक्षेत्र येते. या परिक्षेत्रात वासोटा हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड हे या किल्ल्याचे दुसरे नाव असून घनदाट झाडी, कठीण चढण यामुळे साहसी गिर्यारोहकांना हा किल्ला आपल्याकडे नेहमीच खुणावतो.या किल्ल्यावर गेल्यास या ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी, राजवाड्याचे अवशेष, शिवमंदिर आणि बाबूकडा नावाने ओळखला जाणारा मोठा किनारा पहायला मिळतो हि ठिकाणे येथील सर्वात खास वैशिष्ट्ये आहे.

पर्यटनाचा पावसाळ्यानंतर हंगाम सुरू होताच पर्यटकांना वासोट्यावर जाण्याचे वेध लागतात. मात्र, पावसाळ्यात तेथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. वारेही जोराने वाहतात. त्यामुळे शिवसागर जलाशय पूर्णपणे भरतो. त्यामुळे या याठिकाणी बोटीने जाणे धोकादायक ठरू शकते.

Vasota

जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न मानले जाते. किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरुज आढळतात. परिसरातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.

Vasota Fort

वासोटा बंद करण्यामागे ‘हे’ आहे खरं कारण

जून ते ऑक्टोबर हा कालावधी बहुतांश वन्य प्राण्यांचा प्रजननचा कालावधी असतो. या काळात पर्यटक वासोटा किल्ल्यावर आल्यास वन्य प्राण्यांना ते अडचणीचे ठरू शकते. त्याचप्रमाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अतिपावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात घडू शकतात. ते टाळण्यासाठी या कालावधीत वासोटा पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

VASOTA AND NAGESHWAR CAVES

…तर कारवाई केली जाईल

आता वासोटा हा किल्ला बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे बामणोली परिसरातील सर्व पर्यटन व्यावसायिक व बोट क्लबनाही याबाबतची सूचना वनविभागाने दिली आहे. पुढील पर्यटन हंगाम सुरू होण्याविषयीच्या सूचना पावसाळ्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांप्रमाणे देण्यात येतील. १६ ऑक्टोबरपर्यंत वासोटा येथे कोणी प्रवेश केल्याचे आढळल्यास प्रचलित कायदा व नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.