कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा माहिती अधिकारी पदी नुकतीच वर्षा पाटोळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी पदी कार्यरत होत्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी येण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक, तसेच मुंबई येथेही वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी सांगलीत उत्तमरीतीने काम पाहिले असून आता त्याची सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. उत्तम प्रशासकीय सेवेत काम पाहिलेल्या वर्षा पाटोळे यांच्याकडून निश्चितच सातारा जिल्ह्याचेही काम उत्तमरीतीने पाहिले जाईल यात शंका नाही.