सातारा प्रतिनिधी । 365 वा शिवप्रतापदिन सोहळा रविवार, दि. 8 डिसेंबर रोजी वाई येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवप्रतापदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 365 वा शिवप्रतापदिन मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी शिवशके 351, दि. 8 डिसेंबर 2024 रोजी वाई येथील शिवतीर्थ (सर सेनापती हंबीरराव मोहीते नगर), गणपती घाट, गणपती आळी येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भारतानंद सरस्वती महाराज पालघर उपस्थित राहणार असून यावेळी वीर जिवा महाले पुरस्कार दिल्ली येथील सुर्दशन न्यूज चॅनलचे चेअरमन व मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाण के, पंताजीकाका बोकील आणि अभिवक्ता पुरस्कार खेड मंचर, पुणे येथील उच्च न्यायालयाचे वकिल नीलेश आंधळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी गणेश फरांदे प्रस्तुत श्री डान्स अॅकॅडमी, वाई यांचा ‘शिवरायांचा शिवप्रताप’ हा कार्यक्रम तसेच किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन गणेश जाधव यांनी केले आहे.