मतदार जनजागृतीसाठी सातारला जिल्ह्यात शाळा, विद्यालयांमध्ये विविध उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनासह जिल्ह्यातील शाळांचाही पुढाकार दिसून येत आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

विद्यार्थी व शिक्षकांकडून मतदान जनजागृती फेरीतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढावी व आपल्या एका मताला लोकशाहीमध्ये किती महत्त्व आहे याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात देण्यात आले. कार्यक्रमांना मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

स्वीप कार्यक्रमांतर्गत जागृती विद्यार्थी रॅली, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, संकल्प पत्र, मतदान शपथ, व्याख्याने, मानवी साखळी, पथनाट्य, सेल्फी पॉइंट असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या माध्यमातून मतदानाचा हक्क व जागृती याबाबत नागरिकांमध्ये संदेश देण्यात आले.

सातारा तालुक्यातील शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयात व फलटण तालुक्यातील सालपे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली. शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयाने रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, जनजागृती रॅली व मतदान कसे करावे यासारख्या प्रात्यक्षिकातून जनजागृती करण्यात आली.

पाटण तालुक्यातील विहे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे गावामध्ये जनजागृती केली. चला जावूया मतदान करायला, मतदानाचा हक्क बजवा मात्रभूमीच शान वाढावा, 18 वर्षावरील तरुण, वयोवृद्धांनी येत्या 20 नोव्हेंबरला घराच्या बाहेर पडून मतदान करण्याचे आवानही विहे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे ग्रामस्थांना आवाहन केले.

सातारा जिल्हा परिषदेकडून आयोजन

जनजागृतीचे कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक म्हणजेच मतदार यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.